मुंबई - होळी उत्सवात घडणार्‍या दुर्घटना यां विषयी प्रबोधन आणि दुर्घटना घडल्यास उपचार करण्यासाठी १० मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार पथकाद्वारे पश्‍चिम मुंबई, तसेच भांडुप येथे रुग्णवाहिका फिरवण्यात आली. भांडुप येथे या उपक्रमासाठी पंचमुखी सेवा संस्थानच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली. 

  यामध्ये भाजपच्या कोकण विकास आघाडीचे रत्नागिरी संपर्क प्रमुख राजेश गोलपकर, सनातन संस्थेचे रमेश घाटकर, हिंदु जनजागृती समितीचे गोविंद दळवी यांसह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम्.एम्. मुजावर यांना निवेदन देतांना समितीचे शिष्टमंडळ
हा उपक्रम राबवतांना नाहूर येथे कामावर असलेल्या पोलिसांवर पथकाद्वारे वैद्यकीय उपचार करण्यात आले.तसेच होळी आणि रंगपंचमी उत्सवांतील गैरप्रकार रोखण्यासाठी मीरारोड, दहिसर, बोरीवली (प.), बोरीवली (पू.), कांदिवली, चारकोप, जोगेश्‍वरी, भांडुप, मुलुंड, नवी मुंबई आदी विविध १२ पोलीस ठाणे व तहसील कार्यालय येथे निवेदने देण्यात आली.यासह हस्तपत्रके वितरण करून आणि फलकप्रसिद्धी यांद्वारे होळी आणि रंगपंचमी धर्मशास्त्रानुसार साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. यासह महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले. समितीच्या या मोहिमेविषयी एम्.एच्.बी. कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे, बोरीवली (प.) पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांनी समिती हे कार्य समाजासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले.
 
Top