पंढरपूर -कल्पनेच्या कुंचल्याने चित्र मी रेखीले
मैफलीच्या सप्तसुरांचे रागरंग रंगले
सूर ताल लयीचे सप्तरंग तरंगले
स्वरबहार रंगबहार मैफलीचे भावरंग उमटले

पंढरपूरातील अनेक संगीत महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व ख्यातनाम कलाकार मंडळींचे पोर्टेट स्केच पंढरपूरातील रंगांच्या दुनियेतील प्रसिद्ध आर्टिस्ट भारत गदगे यांनी तयार करुन गायन आणि संगीताच्या मैफलीत आपल्या हाताने रंग भरुन कलाकारांचे आणि श्रोतुवर्गाचे मन तृप्त केले आहे .आतापर्यंत त्यांच्या कलाकृती राष्ट्रपती, पंतप्रधान ,राज्यपाल,मुख्यमंत्री भवनात पोहचल्या आहेत.


भारत गदगे सर यांना आतापर्यंत राज्य आणि देशातील विविध राज्यांमधून चित्रकला क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.


भारत गदगे यांना त्यांच्या विविध स्केचेस आणि मूर्ती बनवण्याच्या कामांमध्ये त्यांच्या अर्धांगिनी मंजुषा ताई यांचा मोलाचा वाटा आहे असे भारत गदगे सर अभिमानाने सांगतात.
 
Top