बारामती - बारामती शहरात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की कृपया कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाकडून येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करा.संकटाचा विस्तार होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या घरातच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करावी म्हणजे  या संकटाला सक्षमपणे तोंड देता येईल.  शहरा तील काही भागांतील वाहतूक कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वळविण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

   सर्वांनी आवश्यक ती काळजी घेत घरातच सुरक्षित राहावे .जे होम क्वारंटाईन आहेत त्या लोकांनी घराबाहेर अजिबात पडू नये ,असे आवाहन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे 
 
Top