नातेपुते (श्रीकांत बाविस्कर) -फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवरून सहा जणांनी येऊन गाडी अडवून शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल लंपास करून दरोडेखोर फरार झाले आहेत. 


  चिवरी व उमरगा गावातील भाविकांनी आळंदी, देहू ,जेजुरी, शिंगणापूर, पंढरपूरच्या देवदर्शना करिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु, आळंदी, जेजुरी करून फलटण मार्गे शिंगणापूर ला जात असताना रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर तळेगावच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडीला तीन मोटरसायकलवरील लोकांनी पास करून घाटात गाडी थांबवली आणि  ड्रायव्हरकडील क्रूजर गाडीच्या चाव्या हिसकावून घेतल्या व सर्व जणांना तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड , लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिलाकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली व ते मोटरसायकलीवरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले. 

   एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन ६ अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले. त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 159 या गाडीच्या काचा फोडून १००० रुपयांचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशनचे स.पो.नि.युवराज खाडे हे करीत आहेत.
 
Top