पंढरपूर - देशामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेक रुग्ण कोरोनाची लागण झालेले आढळून आलेले आहे . खबदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी संचार बंदी लागू केलेली आहे . शक्य असल्यास घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. सामान्य व गरीब जनतेला रोज कामाला गेल्या शिवाय घर चालविणे अवघड आहे अशा लोकांना  आठवडा किंवा महिन्याचा बचत गट व फायनान्स च्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहेत त्यांना या कोरोना व्हायरसमुळे काम मिळेनासे झाले आहे. तसेच आठवडा बाजारही बंद झालेला आहे तरी पंढरपूर तालुक्यातील व शहरातील सर्व व प्रामुख्याने पंढरपूरमधील फायनान्स व बचत गटाच्या लोकांना बोलावुन या कोरोनाची परिस्थिती संपत नाही तोपर्यंत हप्त्यासाठी वसुली , मुजोरी व तगादा लावू नये अशा सुचना देण्यात याव्या अशी विनंती समस्त महादेव कोळी समाज संघाचे युवक जिल्हाध्यक्ष बबलु बोराळकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

    निवेदन देते वेळी समस्त महादेव कोळी समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप माने, जिल्हा अध्यक्ष सुनील अधटराव,उमेश अभंगराव,अदित्य माने आदी उपस्थित होते.

दिनांक २०/ ०३ / २०२०
 
Top