जैनवाडी-कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत जैनवाडी,ता. पंढरपूर मार्फत अतिशय कठोर पावले उचलण्यात आली असून त्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत व घेतलेल्या निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व जनजागृतीसाठी स्पिकर लावलेली गाडी गावठाण व वाडी वस्त्यां मध्ये फिरवण्यात येत आहे त्यातून जनजागृती करण्यात येत आहे. संपूर्णपणे गाव बंदी करण्यात आलेली असून काम बंद ठेवण्यात आलेले आहे , कोणताही व्यक्ती घराबाहेर पडणार नाही, बाहेरील व्यक्ती गावांमध्ये येणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं पाऊल जैनवाडी ग्रामपंचायतीने सर्वांच्या अगोदर उचललेले आहे. सर्व गावकऱ्यांनी स्वेच्छेने या गोष्टीस प्रतिसाद दिलेला असून प्रत्येकाने आप-आपल्या घरामध्ये थांबण्याचे ठरवलेले आहे. बाहेरगावावरून विशेष करून पुणे, मुंबई व इतर शहरातून आलेल्या सर्वांची व्यक्तीनिहाय नोंद त्याचं प्रवासाचे डिटेल्स ,तपासणीचे नियोजन ,लक्षणे आहेत अथवा नाहीत अशा सर्व नोंदी घेवून त्यांना घरातच राहण्याच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जैनवाडीचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिपक पवार यांनी दिली आहे .
 
Top