आधार बहुउद्देशीय सेवा मंडळ आणि नाम फाउंडेशन आयोजित पंढरपूरमध्ये अकरा जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
"जिथे कमी तिथे आम्ही" हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्य करत असणारे समाजसेवक संतोष कवडे यांनी भरलेला हा सातवा सामुदायिक विवाह सोहळा होता.आतापर्यंत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून संतोष कवडे यांनी १३६ जोडप्यांचे विवाह करून दिलेले आहेत.
येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीस जेवणाची व्यवस्था आणि रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
आपली माणसं बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये "घरोघरी शिवजयंती" या संकल्पनेतून शिवजयंती सजावट स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण हे सिने अभिनेता नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ओडिसामधील भुवनेश्वर येथे २२ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेमध्ये पंढरपूरचे गजराज राजाभाऊ डोके यांनी तलवारबाजीमध्ये रौप्य पदक मिळवल्या बद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
गुरुवर्य अतुलशास्त्री भगरे महाराज, सिनेकलाकार नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, चेअरमन प्रकाश पाटील, भगीरथ भालके, समाधान काळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बीजू अण्णा प्रधाने, प्रणव परिचारक उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, नगरसेवक प्रशांत शिंदे मुन्ना मलपे, संतोष बंडगर, गोपी वाडदेकर, विनोद लटके, सतिश श्रीखंडे, अतुल लटके,सागर चव्हाण, संदीप मुटकुळे, सोपान काका देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला.
हा विवाह सोहळा संपन्न होण्यासाठी आधार प्रतिष्ठान ,आपली माणसं बहुउद्देशीय सेवा मंडळ व पंढरपुरातील सर्व सामाजिक संघटना यांनी परिश्रम घेतले.