खर्डी ,(अमोल कुलकर्णी)-भंडीशेगाव ता.पंढरपूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कृषी पर्यटन केंद्राचे भूमिपूजन सौ.वेणूबाई कंडरे यांच्या हस्ते करण्यात आले .  


यावेळी निकिता पवार उपस्थित होत्या.राज्यामध्ये कृषी पर्यटन केंद्राचे काम सातारा,पुणे,कोकण,या भागात जास्त प्रमाणात असून सोलापूर जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्र नाहीत, ही गोष्ट लक्षात घेऊन सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिला कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्याचा संकल्प आलिशा कंडरे यांनी केला होता.त्या कृषी पर्यटन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. 


महिलांनी सर्वच क्षेत्रात प्रगती केली असून,कृषी पर्यटन क्षेत्रात देखील महिला अग्रेसर राहतील असे निकिता पवार यांनी यावेळी सांगितले. या ड्रीम कृषी पर्यटन केंद्रामध्ये लहान मुलांसाठी खेळणी , प्राणी ,पक्षी यांची ओळख होण्यासाठी माहिती, स्विमिंग पूल,रेन डान्स तसेच ग्रामीण भागातील जीवन दर्शन या ठिकाणी होणार असून हे कृषी पर्यटन लवकरच सुरू होणार असल्याची माहिती साधना गिड्डे यांनी दिली .

   

यावेळी निकीता पवार ,वर्षा येलमार,भाग्यश्री क्षीरसागर, कृषी सहायक आशा यादव,साधना गिड्डे ,कांता येलमार,हसीना शेख ,उज्ज्वला शिंदे, शकीला शेख,विजया येलमार,छाया गिड्डे ,मनीषा येलमार,अनिता सोनवणे,राजश्री कंडरे सह महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.
 
Top