पंढरपूर - जागतिक मार्च महिला दिनानिमित्त पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे पंढरपूर शहर व तालुक्यातील केमिस्ट भगिनींचा सत्कार केमिस्ट भवन येथे करण्यात आला. महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते .

   यावेळी उपस्थित महिलांना डॉक्टर ऋतुजा  गोळवलकर उत्पात, डॉ.आशीष चव्हाण यांनी आरोग्य विषयी समस्या व त्यावरील उपायां संदर्भात मार्गदर्शन केले . प्रा.प्राजक्ता मोरे,अमृता सादिगले या प्रमुख उपस्थित होत्या.

 यावेळी सौ दिपाली कारंडे ,सौ. माधुरी जाधव, सौ प्रियंका आंबरे ,सौ करचे या होलसेल व्यवसाय करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व केमिस्ट महिलांचा फेटे बांधून यथोचित सन्मान करण्यात आला.

       या कार्यक्रमासाठी केमिस्ट असोसिएशनचे महिला पदाधिकारी सौ अमृता माने ,प्रियांका गुठाळ व केमिस्ट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन सौ.श्रद्धा कुलकर्णी यांनी केले.
 
Top