भाग -3....

१२ .ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होता.सेव्ह दी चिल्ड्रेन कँनडा तसेंच साखर आयुक्त व आय.एल.ओ यांच्या मदतीने राज्यात साखर शाळा विस्तार , तसेंच सदर शाळा शासकीय अनुदानपात्र करणं यांत कमालीची प्रगती करता आली .सुमारे ५०,००० मुलांना मुख्य प्रवाहात आणता आलं .
१३.प्राथमिक शिक्षण सर्वाना गुणवत्ता प्रधान प्राप्त झालं पाहिजे म्हणून शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या सहकार्याने सर्वात आधी शिक्षण हे व्यासपीठ निर्माण करून सूत्रबद्ध काम कार्यान्वित केलं .याची टिप्पणी युनिसेफ द्वारा करण्यात आलेली आहे .
१४.आय.एल .ओ .नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांचे समवेत बालकामगार मुक्ती ,कायद्याची अंमलबजावणी व त्यांना मुख्य प्रवाहात आणणे , बालहक्क आयोग स्थापना यासाठी यशस्वी वाटचाल सर्वाना भुषणावह आहे .
१५.विशेष भुषणावह योगदान म्हणजे एक वर्ष कराराने वर्षोंण्वर्षे दिलेल्या वन जमीन निर्वनींकरणं करून संबंधीताचे नावे सात बारा उताऱ्यावर नोंद करणं हा यशस्वी लढा खूप अभिनंदनींय पाऊल आहे .
शंभर वर्षातील हा एकमेव लढाआहे.सन १९८३ तें १९८७ पर्यन्त मुंबई उच्च न्यायालयात लढा सुरू होता.अखेर ही लढाई जिंकली .सोलापूर जिल्ह्यातील सूमारे १७५०० हेक्टर जमीन निर्वनींकरन करून मागासवर्गीय ,भटके विमुक्त, इतर मागासवर्गीय ,अल्पभूधारक यांना याचा लाभ झाला.तत्कालीन जिल्हाधिकारी र.य.गायकवाड यांनी अत्यंत महत्वाचे सहकार्य करून नोंदी करून घेतल्या .
या यशस्वी लढ्यासाठी आदिवासी भागात सत्य शोधक कम्युनिस्ट पक्षाचे विचारबंत शरद पाटील उर्फ श.पा. यांनी इसारवाडी ,जिल्हा धुळे येथे माझा सत्कार केला ....
( क्रमशः भाग -४ उद्या ....
 
Top