जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसच्या दहशतीमुळे भारतातही काहीसं भीतीचं वातावरण पसरले आहे. जगभरात आतापर्यंत ९० हजारहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे तर तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातल्या ७५ हून अधिक देशात हा विषाणू संक्रमित झाला आहे. म्हणूनच भीती निर्माण करण्यापेक्षा हे संक्रमण कसं टाळता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. हा कोरोनाचा आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सार्वजनिक व वैैयक्तीक काय काळजी घ्यायची हे लक्षात घ्यायला हवे .


आपला सर्वात जास्त वेळ सार्वजनीक ठिकाणी जात असतो. त्यामुळे तेथील स्वच्छता महत्त्वाची आहे. शिवाय त्या ठिकाणी जास्त लोक असतात, त्यामुळे कोणताही व्हायरस पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाय झेशनने काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत ती पाळली तर संक्रमणापासून आपले संरक्षण करू शकतो .

जेथे बसून तुम्ही काम करत आहोत, तो भाग तुम्ही स्वच्छ ठेवा. डेस्क, टेबल, टेलिफोन, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, की-बोर्ड, माउस आदि जंतुनाशकाने स्वच्छ करा. असं यासाठी करावं कारण जर कोणी शिंकलं किंवा खोकलं तर या वस्तूंवर जंतू खूप काळपर्यंत जिवंत चिकटून राहतात आणि त्यापासून आपल्याला संसर्ग होऊ शकतो.

त्यासाठी कामाच्या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नियमित हात धुण्यासाठी प्रेरित करा. याव्यतिरिक्त हँड सॅनिटायजर कामाच्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून कर्मचारी त्याचा वापर करू शकतील. नियमित हात धुण्याची सवय लागली तर कोरोनाच काय कोणताही विषाणू संंसर्ग होणार नाही.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, कार्यालयात कर्मचाऱ्यांना डिस्पोजेबल वाइप्स द्यायला हवेत. दरवाजांचे हँडल, नॉब, लिफ्टचे बटण, रिमोट कंट्रोल, डेस्क आदिंना स्पर्श करण्याआधी एकदा या वाइप्सने स्वच्छ करता येईल. 

कामाच्या ठिकाणी मास्क किंवा टिश्यू पेपर ठेवा, जेणेकरून ज्यांना सर्दी झालीय ते यांचा वापर करू शकतील आणि इतरांना संक्रमण होणार नाही. मात्र ज्याला सर्दी किंवा खोकला आहे, त्या प्रत्येकाला कोरोनाच झालाय, अशा संशयी नजरेने त्याच्याकडे पाहू नका. तो साधा फ्लू देखील असू शकतो, जो वातावरण बदलामुळे होतो. 

  सर्वसामान्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा आणि त्यांना जागरुक करा की ताप, सर्दी-खोकला, अंगदुखी अशी लक्षणं दिसल्यास कामावर जाण्याऐवजी घरीच आराम करा, जेणकरून संक्रमण रोखता येऊ शकेल. आजारी व्यक्तीने त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, औषधे घ्यावीत आणि आवश्यक त्या चाचण्या करा.

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोनाला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महारोगराई घोषित करण्यात आलं आहे. भारता मध्येही करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ६८ वर पोहचली आहे. त्यापैकी ११ रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात जन जागृती करण्यासाठी सर्व टेलिकॉम ऑप्रेटर्सला ऑडिओ क्लिप चालवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीला फोन केल्यानंतर करोनाची माहिती देणारी कॉलर ट्यून वाजल्या नंतरच फोन कनेक्ट होतो.मात्र खोकल्याच्या आवाजाने सुरु होणाऱ्या या कॉलर ट्यूनला सर्व वैतागले असल्याचे दिसत असून सोशल नेटवर्किंग वरुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
Top