कोरोना हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून तो माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. covid-19 (coronavirus Disease-2019) हे या विषाणूचे नाव आहे.कोरोना व्हायरस हे नाव विषाणूला मुकुटासारख्या आकारामुळे मिळाले.

  या विषाणूची निर्मिती वटवाघळाच्या माध्यमातून झाली असल्याची दाट शक्यता दर्शविण्यात येत आहे. हा साध्या सर्दीपासून मर्स (middle East respiratory syndrome)  आणि सार्स severe acute respiratory सारख्या श्‍वसनसंस्थेला सूज आणणार्‍या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे.

 डिसेंंबर २०१९ रोजी चीन देशातील वुहान शहरात या विषाणूचा उद्रेक घोषित करण्यात आला. डॉ. ली वेनलियांग यांनी या विषाणूचा खुलासा केला. या विषाणूची बाधा झाल्यामुळे त्यांचा यात मृत्यू झाला. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे आणि हे राज्य सोडले तर इतर राज्यांत याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता कमी आहे. पण, तरीही काळजी ही घ्यायलाच हवी.


अनेक देशांत कोरोना बाधित रुग्ण सापडू लागले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (Who-world heath organisation) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

 याची लक्षणे डोळेदुखी, नाक गळणे, कोरडा खोकला, घसा खवखवणे, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंक येणे, धाप लागणे, थकवा येणे, श्‍वसनात त्रास होणे, मूत्रपिंड निकामी होणे.
खोकल्याद्वारे शिंकण्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. या रोगाने आजारी रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा त्यातून जो फवारा बाहेर पडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातून हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर बसतात या वस्तूंना हात लावल्यावर जेव्हा निरोगी माणूस आपल्या चेहर्‍याला नाकाला, डोळ्याला हात लावतो तेव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो. या विषाणूंची बाधा (संसर्ग) दुसर्‍या व्यक्‍तीला होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे.
 
Top