पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेविका श्रीमती मालन भगवान देवमारे यांचे पती व बसवेश्वर देवमारे यांचे वडील भगवान विठोबा देवमारे (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या अत्यंत गरीबीतून प्रपंच उभा केला. ते स्वतः निरक्षर असूनही त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले . त्यांची नातवंडे आज कॅम्प्यूटर इंजीनियरिंग, मेडिकल ,अँग्री, सिव्हिल इंजि.अशा उच्च पदावर काम करत आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने पंढरपूरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात मुले,सुना,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
 
Top