नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य शिरोडकर,प्रदेशाध्यक्ष- विद्यार्थी सेना, दिलीप धोत्रे - प्रदेशाध्यक्ष सहकार सेना यांच्या आदेशाने व माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे,माळशिरस तालुकाध्यक्ष सुरेश टेळे यांच्या विचारांनी व विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रेम देवकाते पाटील,विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश गरगडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नातेपुते शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे ,तालुका मार्गदर्शक संतोष देवकाते पाटील, तालुका संघटक अजित पवार , तालुका कार्याध्यक्ष मनोज लांडगे, तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे, नातेपुते शहराध्यक्ष रवि काळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रेम देवकाते पाटील, तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर, मनसे चित्रपट सेना तालुकाध्यक्ष वैभव कुलथे यांच्यासह असंख्य मनसैनिक उपस्थित होते.