जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे,तालुका विधी सेवा समिती व अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश सी.एस.बाविस्कर, जिल्हा न्यायाधीश आर.ए.सासने,अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एन.के.मोरे,न्यायाधीश एस.एच. इनामदार,न्यायाधीश पी.पी.देशमुख,न्यायाधीश ए.पी.कराड,न्यायाधीश एस.जी.सरवदे,न्यायाधीश श्रीमती आर.जी.कुंभार,अधिवक्ता संघाचे अध्यक्ष भगवान मुळे, उपाध्यक्ष विलास शेळके, सचिव ॲड.राहुल बोडके आदी उपस्थित होते.
महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढयाच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजची महिला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टीने सक्षम झाली आहे. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी आणि सुरक्षेतेसाठी शासनस्तरावर विविध कायद्याची अंमलजावणी करण्यात येते असे न्यायाधीश श्रीमती आर.जी. कुंभार यांनी सांगत महिलांना आपल्या हक्काबाबत जागृती व्हावी यासाठी त्यांचे हक्क, कर्तव्ये, अधिकारी याबाबत माहिती दिली.
महिला विधिज्ज्ञ यांनीही महिलांच्या हक्क, कर्तव्ये,अधिकारी या विषयी मनोगत व्यक्त केले.
प्रियंका जाधव यांनी महिला जनजागृतीपर एकपात्री नाटक सादर केले. यावेळी उपस्थित सर्व विधिज्ज्ञ महिला व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह, तुळशीचे रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.