२४ फेब्रुवारी रोजी इटली मध्ये फक्त ५ कन्फर्म कोरोना रुग्ण होते व एकही मृत्यू नव्हता, इटली सरकारने देशात प्रथम लॉक डाऊन व नंतर संचारबंदी लागू केली व लोकांना घरातच राहण्याचा आदेश दिला होता, पण लोकांनी तो गांभीर्याने घेतला नाही.लोकांनी आपले रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरूच ठेवले, इटली देशाची वैद्यकीय साधने व रूग्ण सेवा आपल्या देशातील वैद्यकीय सेवेपेक्षा अधिक सक्षम आहेत, ३० दिवसांनी इटली मध्ये ६०००० कोरोना रूग्ण व ५४०० मृत्यू झाले आहेत, इटलीची आजच्या दिवसाची लोकसंख्या ६ कोटी ४ लाख ८५ हजार आहे व भारताची १२५ कोटी, इटली तील लोकांनी सरकारचे न ऐकण्याची किंमत चुकती केली .

   आपण या पार्श्वभूमीवर काही शिकायला तयार आहोत का,की आपल्या प्रियजनांना गमावल्या नंतरच आपले डोळे उघडणार आहेत,याचा निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे असा प्रश्न माजी मंत्री डॉ.सुनील देशमुख यांनी केला आहे .
 
Top