कोरोनाग्रस्त परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा विमा तातडीने उतरविण्याचा महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली सरकारने कोरोना विषाणू विरूध्द अतिशय चांगले नियोजन करून या जागतिक आपत्तीला रोखून धरले आहे. कोरोनाचे संकट हटविण्यासाठी आणीबाणीच्या सेवेत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलिस दल, महसूल विभाग यांचे प्रमाणेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही जीवावर उदार होऊन वार्तांकन करीत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या वीम्याचे संरक्षण नाही.
अनेक प्रतिनिधींना कोणत्याही वृत्तसंस्थेचा आधार नाही तरीही सामाजिक जबाबदारी व राष्ट्रीय सेवा म्हणून ते रात्रंदिवस शहरी व ग्रामिण भागात वार्तांकन करीत आहेत. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई ही संस्था प्रसार माध्यमांचे व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे नेतृत्व करते.संपूर्ण राज्यात संस्थेचे किमान ८०० सभासद असून इतर ५०० प्रसारमाध्यम प्रतिनिधी संस्थेशी अप्रत्यक्ष संलग्न आहेत. शासनाने संस्थेकडे मागणी केल्यास जिल्हा निहाय प्रसारमाध्यम प्रतिनिधींची नावे, पत्ते, मोबाईल व ईमेल संस्था देऊ शकेल. या पत्राद्वारे आम्ही तातडीने विनंती करतो की,आरोग्य,पोलिस,महसूल कर्मचार्‍यां प्रमाणेच प्रसारमाध्यम (संपादक, पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, न्यूज अँकर आणि प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलला काम करणारे प्रतिनिधी) प्रतिनिधींचा विमा उतरविण्यात यावा अशी मागणी किसन भाऊ हासे - अध्यक्ष, नरेंद्र लचके - समन्वयक, जयपाल पाटील - संस्था प्रवक्ता, संतोष शिंदे - पुणे विभाग प्रमुख यांनी केली आहे.
 
Top