पंढरपूरात राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान केंद्र २ येथे आशा कर्मचारी व नगरपरिषदेचे महिला सफाई कर्मचारी प्रतिनीधी यांना या दिवसात येणारे अनुभव ,अडचणींचे विचार विनिमय करुन तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ एकनाथ बोधले यांनी कोरोना विषयी माहिती देऊन , कोरोनासाठी घ्यावयाची काळजी व कोरोनो संशयित असेल तर त्वरित प्रशासनाला माहिती देऊन उपाययोजना कशा प्रकारे करतात याबद्दल माहिती दिली.  

  आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी यांच्या नियोजनाने सदर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विवेक परदेशी यांनी कर्मचारी मार्फत होणाऱ्या कामाचा आढावा घेऊन त्यांना येणार्‍या अडीअडचणी जाणून घेऊन नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून त्वरित मदत, उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.


" घाबरु नका पण जागरुक रहा " असा संदेश तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले यांनी दिला व सांगितले की नागरिकांनी मास्क किंवा सॅनिटायजर वापरलंच पाहिजे, मास्क परिधान केला पाहिजे असा हट्ट धरु नका, साबणाने जरी हात धुतले तरी आपण सुरक्षीत आहोत असे सांगितले, गरज भासल्यास मास्क किंवा रुमालाची चार पदरी घडी करुन सुरक्षेसाठी त्याचा वापर करता येतो, फक्त वापरानंतर गरम पाण्यात असे रुमाल भिजवून स्वच्छ धुऊन परत वापरात येतील असे सांगितले. या दिवसात गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा ,गरज असेल तरच प्रवास करा, कोणालाही लांबूनच नमस्कार करा ,हस्तआंदोलन टाळा .                     

या प्रसंगी नागरिकांना अवाहन करण्यात आले की आपणास कोणाही व्यक्तीला खोकला आणि ताप असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा किंवा आशा कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी किंवा नगरपरिषद कर्मचाऱ्यांना निर्दशनास आणुन द्यावे.त्वरित उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

 सदर चर्चासत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ बजरंग धोत्रे, डॉ राजश्री सालविठ्ठल, उपजिल्हा रुग्णालय वै.अधिकारी डॉ प्रदिप केचे, स्त्रिरोग तज्ञ डॉ स्वाती बोधले, डॉ प्रिया भिंगे, बालरोग तज्ञ डॉ निरज शहा, डॉ संगीता पाटील , डॉ आश्विनी परदेशी यांनी प्रश्र्न समजुन घेउन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  या प्रसंगी नगरसेवक महादेव भालेराव, सभापती विवेक परदेशी आदि उपस्थित होते.
 
Top