पंढरपूर - दिनांक ०७/०३/२०२० रोजी “समाज कार्यासाठी, समाज संघटन” हे ब्रीद असलेली “सावता परिषद” यांच्यावतीने सामाजीक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “सेवा गौरव” हा पुरस्कार शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग, पंढरपूर पंचायत समिती सदस्य व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती,पंढरपूर संभाजीराजे शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते पुष्प हार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
   त्यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आ.यशवंत माने, संतोष राजगुरू ,मुख्य प्रदेश संघटक, सावता परिषद व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
 
Top