पंतनगर,कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स या कारखान्याच्या ६ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ मंगळवार दि.०३/०३/२०२० रोजी पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. चालू गळीत हंगामात युटोपीयन शुगर्सने ४ लाख मे.टनाचे गाळप पूर्ण केले आहे. सदरच्या सांगता समारंभप्रसंगी पांडुरंग स.सा, कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंत देशमुख,रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, पां.स.सा.का.माजी चेअरमन दिनकर मोरे, कृ.उ. बाजार समितीचे मा.सभापती दाजी पाटील, दामाजी स.सा.कारखान्याचे मा.चेअरमन चरणूकाका पाटील,ईन्नूसभाई शेख, पां.स.सा. कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंतराव कुलकर्णी,पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे,शिवाजी नागणे,चंद्रशेखर कौंडुभैरी ,ज्ञानदेव ढोबळे,राजुबापू गावडे,रतीलाल गावडे ,नामदेव जानकर,दादा गरांडे,अरुण किल्लेदार,कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,पत्रकार यांच्या समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

  

स्वागत व प्रास्ताविक करताना कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,राज्यात सर्वाधिक साखर कारखाने आपल्या जिल्ह्यात आहेत. ऊस उत्पादकांच्या हितासाठी साखर कारखान्यांची निर्मिती केली.ते कारखाने टिकणे व टिकवणे ही काळाची गरज आहे.युटोपियन शुगर्स ने सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थीतीतही ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. उद्दीष्ट पूर्ण करणारा युटोपियन शुगर्स हा सोलापूर जिल्ह्यामधील खाजगी कारखान्यामध्ये एकमेव आहे. गतवर्षी युटोपियन शुगर्स ने ६,३२,३११ मे.टन ऊसाचे गाळप करून एक नवा उच्चांक निर्माण केला होता.मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे जनावरांच्या चार्यासचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणात चारा म्हणून केला गेल्यामुळे गळीत हंगाम २०१९-२०२० करिता ऊसाचा प्रश्न कारखानदारांपुढे उभा होता .युटोपियन शुगर्सच्या प्रगतीचा आलेख हा सुरुवातीपासूनच चढता आहे. युटोपियन शुगर्सने मागील ५ ही गळीत हंगामा मध्ये एफ.आर.पी.पेक्षा जास्तीचा दर देण्याची परंपरा कायम राखून ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केल्याने गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वीच मिल रोलर पूजन प्रसंगी दिनांक ०३ जुलै २०१९ रोजी ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेऊन २०१९-२०२० या आव्हानात्मक हंगामास सामोरे जाण्याचा धाडसी निर्णय युटोपियन प्रशासनाने घेतला. तसेच निडवा ऊसपीक संवर्धंनासाठी प्रति टन १०० रुपये जादा दर देणार असून गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल कारखान्याचे कार्यकारी संचालक,अधिकारी व सर्व कर्मचार्‍यांचे मी अभिनंदन करतो व त्यांना पांडुरंग परिवाराचे कुटुंब-प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांच्या सूचनेनुसार १० दिवसांचा पगार बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा चेअरमन उमेश परिचारक यांनी केली.

(सर्व छायाचित्रे : सागर राजमाने)

 राहुल शहा,चरणूकाका पाटील, दिनकर मोरे,डॉ.यशवंतराव कुलकर्णी,ईन्नूसभाई शेख,उमेश विरधे आदींची समायोचित भाषणे झाली.

  यावेळी सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे ऊस उत्पादक सिद्धापुर ता. मंगळवेढा येथील अण्णासो शिवगोंडा पाटील आडसाली लागण प्रति एकर १०४ मे.टनाचे उत्पादन, शिवणे ता.सांगोला येथील धोंडीराम यशवंत जानकर खोडवा पीक प्रति एकर ६० मे.टनाचे उत्पादन ,तळसंगी ता.मंगळवेढा येथील अलका सुभाष पवार निडवा पीक प्रति एकर ६० मे.टनाचे उत्पादन तसेच वाहतूक ठेकेदार यांनी चालू गळीत हंगामामध्ये सर्वाधिक ऊस वाहतूक केल्याबद्दल नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील बंडू दादा करे प्रथम क्रमांक ३५०७ मे.टन वाहतूक, पाठखळ ता.मंगळवेढा येथील शत्रुघ्न दगडू शिंदे द्वितीय क्रमांक २८६३ मे. टन वाहतूक,पाठखळ ता.मंगळवेढा येथील प्रताप शिंदे तृतीय क्रमांक २५६० मे. टन वाहतूक केल्याबद्दल व सर्वाधिक ऊस उत्पादन घेतल्याबद्दल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.  

 गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल सर्व खाते-प्रमुख,अधिकारी तसेच तोडणी वाहतूकदारांचा  यांचा पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर ऊस उत्पादक व तोडणी वाहतूकदार यांच्यावतीने कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमाची सुरुवात कारखान्याच्या डिस्टिलरी विभागाचे सिनिअर केमिस्ट राजाराम पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजेने करण्यात आली.

आभार मुख्यशेती अधिकारी धनंजय व्यवहारे यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले.
 
Top