पंढरपूर,(विजय काळे)-येथील आयडीबीआय बँकेच्या पंढरपूर शाखेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी पंढरपूरातील डाॅ. संगीता पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या ९ बचत गटांना २२.८० लाखांचे कर्ज मंजुरी पत्र देण्यात  आले.

 या कार्यक्रमास  वंदना बिडकर, मानसी कर्वे, मयुरा दोशी, सुजाता राऊत व पद्मिनी गोसावी मॅडम उपस्थितीत होत्या.

 याप्रसंगी बोलताना डाॅ. संगीता पाटील म्हणाल्या की, पुढील काळात महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून नवनवीन उद्योग व्यवसाय सुरु करून सक्षमपणे काम करावे. मी स्वतः बचतगटाच्या महिलांना सर्वतोपरी सहकार्य करेन . 

 बँकेचे शाखाधिकारी धनंजय करंडे यांनीही मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेच्या  मॅनेजर मयुरी घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक बॅकेचे ऑफिसर विवेक शंकर यांनी  केले. आभार मॅनेजर सुहास साळुंखे यांनी मानले.

 आयडीबीआय बँकेच्या महिला दिनाच्या या कार्यक्रमास बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top