पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र हौशी मलखांब स्पर्धेत महाराष्ट्रामधून आयुष काळणजे - सातारा, वेदांत  भाकडे - पुणे,निरंजन अमृते- मुंबई, वेदांत वाडेकर -मुंबई, सोहम शिगवण- मुंबई,श्लोक अरुण पाटील -चोल, अलिबाग यांची निवड झाली आहे. १२ वर्षा खालील ३९ वी ही राष्ट्रीय स्पर्धा ५ ते ७ मार्च त्रिवेणी भवन, दयापार विलासपूर,बिहार येथे होणार आहे .संघासोबत व्यवस्थापक यशवन्त  साटम हे आहेत. श्लोकला नुकतेच ठाणे महापौर चषकमध्ये ब्राँझ पदक मिळाले होते त्याबद्दल रायगड भूषण,आपत्ति व सुरक्षा तज्ञ,राष्ट्रीय सचिव - भारतीय पत्रकार संघ जयपाल पाटील यांनी त्याचे घरी जाऊन स्पर्धेत सुयश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top