स्वेरीमध्ये ‘क्षितीज २ के २०’ कार्यकम संपन्न


पंढरपूर- ‘क्षितीज २ के २०’ इव्हेंटच्या माध्यमातून बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक संशोधनात आपला वेळ घालवून नवीन निर्मिती करत आहेत.  त्यामुळे स्वेरीतील संशोधनात प्रगती होत असून त्याची गती आता वाढत आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक व मानसिक क्षमता लक्षात घेतली तर भविष्यकाळात अधिकाधिक संशोधन होईल.’ असे प्रतिपादन स्वेरी संचलित  डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी मिसाळ यांनी केले.

    

      येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरमध्ये मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन) आणि द इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडीया), कोलकाता स्टुडंट्स चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने आयोजिलेल्या ‘क्षितीज २ के २०’ या तांत्रिक संशोधन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डिप्लोमा इजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.मिसाळ मार्गदर्शन करत होते.  

   प्रारंभी मेसा प्रतिनिधी सिद्धेश्वर खपाले यांनी ‘क्षितीज २ के २०’ इव्हेंट विषयी सविस्तर माहिती दिली. मेकॅनिकल इजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना संशोधन स्पर्धेसाठी प्रेरित केले. या कार्यक्रमामध्ये आठ प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमासाठी बाहेरील महाविद्यालया तून आलेल्या जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस, स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे याचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, प्रा. एस.व्ही.कुलकर्णी, समन्वयक प्रा.संजय मोरे व विविध महाविद्यालयातून आलेले सहभागी विद्यार्थी उपस्थित होते. श्रद्धा गजाकोश व प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले.आभार विद्यार्थिनी सचिवा शुभदा म्हेत्रे यांनी मानले.
 
Top