आम्ही सर्व खूप शहाणं समजतोत 
कोणीही सत्तेत असों 
जनहितार्थ आदेश काढताच 
आम्ही हे कसं चुकीचे 
वा हे कसं गैरसोयीचे हे बडबडतो 
संधी मिळेल तिथे बोलतो लिहतो 
पण औन्शानेही आम्ही 
आमच कर्तव्य पार पाडत नाही 
काल आम्हीराष्ट्रीय कर्फ्यू पाळला 
आज संचारबंदी असूनही 
पुणे धुळे मुंबई इत्यादी शहरात धुमाकूळ घातला 
पण पोलिस आले अनं कायदा दाखवला 
तेंव्हा घरी पळालो कोरोना हा यमदूत 
देश नव्हे तर विश्व गिळंकृत करतो आहे 
सारे देवदेवतांची मंदिरे बंद आहेत 
फक्त आरोग्य विभाग अनं पोलिस रात्र अनं दिवस 
राबत आहेत मानवास संकटमुक्त करण्यासाठी 
प्रसंगि आपला जीव धोक्यात घालून !
आता सर्व अहंकार सोडा आणी लढूयांत 
एकत्रित कोरोना नामशेष करण्यासाठी ....

आनंद कोठडीया , जेऊर ता. करमाळा
९४०४६९२२००

 
Top