पंढरपूर - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रांती महिला मंडळ व एच पी दोशी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर एस टी डेपोतील २० महिला बस कंडक्टर यांचा सत्कार करण्यात आला.
क्रांती महिला मंडळातर्फे रक्तदान शिबिर, शाळेय मुलींसाठी good touch - bad touch बद्दल माहिती,बालकाश्रम -वृद्धाश्रमात दंतरोग चिकित्सा व तेथील महिला कामगारांचा सत्कार ,नगर पालिकेतील महिला सफाई कामगारांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाला क्रांती महिला मंडळ अध्यक्षा सौ.सीमा कोठारी, सौ.दिपा शहा, सौ.राणी दोशी, सौ.निलम कोठारी व मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.
 
Top