पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक भिकाजी मगर सेवानिवृत्त झाले. आज ३१ मार्चला सेवानिवृत्त होत असलो तरी घरी न बसता कोरोना संकट दूर होईपर्यत विनामोबदला पंढरपूरकरांच्या सेवेत राहणार असल्याचे भिकाजी मगर यांनी स्पष्ट केले.
   
    मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून मगर यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बांधकाम विभागाचे प्रमुख नेताजी पवार, नगर रचनाकार केंद्रे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, चिदानंद सर्वगोड, नवनाथ पवार आदी उपस्थित होते.

   श्री.मगर यांनी पंढरपूर नगरपरिषदेत ३५ वर्षे बजावली. आरोग्य विभाग, घरपट्टी, पाणी पुरवठा आदीं ठिकाणी त्यांनी लक्षवेधक काम केले.निवृत्ती निमित्त मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मगर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 
Top