शेळवे ,(संभाजी वाघुले) - शेळवे ता.पंढरपूरसह परिसरात शनिवारी मध्यरात्री व रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला .

 

शेळवे, खेडभाळवणी, देवडे, भंडीशेगाव, पिराची कुरोलीसह काही भागात वादळी वारा व जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने द्राक्ष, गहू ,मका, ज्वारीसह हाताशी आलेल्या अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 शनिवारी रात्री  व रविवारी सायंकाळच्या सुमारास शेळवे व परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली.यामध्ये द्राक्षच्या बागांचे , ज्वारी, हरभरा,गव्हाचे नुकसान झाले आहे.
शेळवे व परिसरात ढगांच्या गडगटासह पावसाने हजेरी लावली. पावसाबरोबर जोरदार वारेही सुरु होते. तर  काही ठिकाणी पावसाचे थेंब इतके मोठे होते कि गारां पडल्या असे अनेकांनी सांगितले.

शनिवारी रात्री व रविवारच्या अवकाळी पावसाने शेळवे सह परिसरातील   द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.ज्वारी, तूर, गहु हरभरा या पिकांच्या राशी भिजून तोंडाला आलेला घास पूर्णपणे वाया जाण्याची भिती आहे. शेतकऱ्यां साठी विषेशतः द्राक्ष बागायतदारांसाठी हा पाऊस मोठे लाखो रूपयांचे नुकसान करणारा ठरणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत .
 
Top