पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली ते टेंभुर्णी नाका येथील रस्ता पंढरपूर नगरपरिषदेने क्राॅकटिकरण करावा. कुंभार गल्ली या परिसरातील सर्वच रस्ते क्राॅकटिकरण करण्यात यावेत.गेल्या अनेक वर्षापासून या भागांतील समस्या सुटलेल्या नाहीत.
कुंभार गल्ली येथील नागरिकांना नगरपरिषदेने त्यांच्या आरोग्यासाठी गटारी व ड्रेनीज यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.मात्र या भागातील नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून रस्ता शोधावा लागतोय त्यामुळे पंढरपूर नगर परिषदचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी लक्ष घालून त्या भागातील नागरिकांना सुविधा देवूून धुळ आणि चिखलापासून मुक्त करावे. नगरपरिषदेने त्या भागातील नागरिकांना सुविधा नाही दिल्यातर विविध रोगांमुळे त्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल. त्यासाठी नगरपरिषदने या नागरिकांना सुविधा द्याव्यात अशा मागणीचे शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने निवेदन नगर परिषदचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना दिले.
 यावेळी शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे, शिवबुध्दचे पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार, शहाजी शिंदे,नृसिंह जाधव,सुरज पवार, किरण शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top