पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील थकित मालमत्ताधारकांना करांची रक्कम भरणेबाबत वारंवार लेखी मागणी बील,नोटीसद्वारे व स्पिकर द्वारे सूचना देवूनसुद्धा व जप्तीपूूर्व नोटीस दिल्या नंतरही त्यांनी कराची रक्कम न भरल्याने त्यांच्या नावाची यादी वृत्तपत्रात प्रसिध्द केली आहे व सदर मालमत्ताधारकांनी कराची रक्कम न भरल्याने शहरातील ३८ नळ कनेक्शन तोडण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली .
        पंढरपूर शहरामध्ये एकुण १९००० मालमत्ता धारक असून ५००० झोपडपट्टीधारक आहेत. या मालमत्ता धारकांकडून मागील ८ कोटी ७९ लाख व सन २०१९-२० या सालाकरिता १० कोटी ८५ लाख अशी एकुण १९ कोटी ६५ लाख रु.चे मागणी आहे. यापैकी ०९ कोटी ९८ लाख रु.वसुल झाले असुन ०९ कोटी ६७ लाख रु.येणे बाकी आहे. सदर वसुलीसाठी नगरपरिषदेतील २५ कर्मचा-यांची ४ विशेष वसुली-जप्ती पथकाद्वारे कर वसुलीसाठी धडक मोहिमे राबविण्यात येत आहे.कर वसुलीची मोहिम प्रभाविपणे राबविण्या च्या दृष्टीने शहरातील ५० हजाराच्या वर थकबाकी असणा-या १६६ मालमत्ता धारकांची थकबाकी दारांची यादी तयार करण्यात आली असून या थकबाकीदारांना पुरेशी व वाजवी संधी देवूनही त्यांनी थकबाकी रक्कम न भरल्याने अशा मालमत्ता धारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत व स्पिकरद्वारेही त्यांच्या घरासमोर थकबाकीची रक्कम भरावी म्हणून नावे पुकारण्यात येणार आहेत तसेच महाराष्ट्र नगर पलिका अधिनियम १९६५ मधील कलम १५२ मधील तरतुदीनुसार थकबाकीदारांना जप्तीची कारवाई करण्याची नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. तदनंतरही सदर मालमत्ता धारकाने थकबाकीची रक्कम न भरल्याने आज नगर परिषदेने सुरु केलेल्या कर वसुली धडक मोहिमे मध्ये शहरातील विठ्ठल साय्याप्पा कांबळे,सुखदेव संदिपान शिंदे,कमल विठ्ठल चौगुले,भारत सोपान आवताडे, सदाशिव कृष्णा गेंड, अंकुश अर्जुन राऊत, श्रीमती मंदा रामचंद्र उडपीकर, महादेव औदुंबर देशमाने,सोबरभ उर्फ केशव संजय गायकवाड, रघुनाथ चंद्रकांत गंगाधर विभुते, विजय विश्वनाथ माने , जगन्नाथ दयाराम चव्हाण, सचिन अरूण कुलकर्णी, सुमन शंकर कुंभार, प्रसाद प्रकाश कोल्हापुरे, सतिश हणमंत बदडे, जालिंदर विठ्ठल टिंगरे,संजय हरिभाऊ बोडके, सुधाकर शंकर कुलकर्णी,प्रभाकर नागनाथ सदानंदे,नानासाहेब भिमराव चव्हाण,हरिदास पांडुरंग पासले, विठ्ठल केरबा शिंदे,छाया कुमार पवार, विमलबाई चिमणराव पुरवत,रोहिदास ट्रस्ट तर्फे रामाप्पा म्हैत्रे,विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कंग्राली,सुधाकर यशवंत बेंदे,गोपाळकृष्ण वासुदेव बडवे, इबाब महिबुब नाडीवाले,दत्तात्रय बापुराव पालकर ,लक्ष्मीबाई नारायण जव्हेरी,शकुंतला व्यंकट कमसल, तुकाराम मधु रामा भांगे ,दत्तु येदु लालबोंद्रे,दत्तात्रय दादासाहेब शिवाजी देशमुख, विमलबाई चिमणराव अरबुज, दत्तात्रय आप्पा कोरके या ३८ मालमत्ताधारकांचे  नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. तसेच ज्या मालमत्ता धारकांची १० हजाराच्या पुढे थकबाकी आहे अशाही मालमत्ताधारकांची नावे वृत्तपत्रात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याच्या मालमत्तेची जप्ती करण्यात येणार आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतरही मालमत्ता धारकांने रक्कम न भरल्यास  शासन निर्देशानुसार व महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम १५६ मधील तरतुदीनुसार मा.जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने सदर मालमत्तेस नगरपरिषदेचे नाव लावण्याची तरतुद करण्यात आल्याने अशा थकबाकीदार मालमत्ताधारकांवर याप्रमाणे कारवाई करण्याची संकेत मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी दिले आहेत.

 सदरची विशेष धडक मोहिम मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.कर अधिक्षक बाळासाहेब कदम, सचिन मिसाळ, अस्मिता निकम, प्रियंका पाटील,राजेंद्र देशपांडे, अनिल अभंगराव, समीर शेंडगे,वारंट लिपिक  संजय माने, सर्व कर लिपीक व शिपाई विशेष धडक मोहिम राबवित आहेत. जमा होणार्‍या कराच्या रमकेतून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार असल्याने थकीत मालमत्ता धारकांनी आपली कराची रक्कम त्वरीत नगर परिषदेकडे भरावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांनी केले आहे.
 
Top