पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय व तालुक्या तील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना पी पी इ किट वाटप करण्यात आले. मंदिरे समितीच्यावतीने सदर ५०० कीटचे वाटप करण्यात आल्यामुळे शहर व तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मंदिर समिती सदस्य संभाजीराजे शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्या व नगराध्यक्षा सौ. साधना ताई भोसले, श्रीमती शकुंतला नडगिरे, मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. प्रदीप केचे, लेखाधिकारी सुरेश कदम व रुग्णालयातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
 
Top