२० मार्च जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून युवासेनेचा स्तुत्य उपक्रम
     

     नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर) - सध्या सर्वत्र कोरोना रोगाने थैमान घातले आहे. सर्वांनी स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे.पण 
उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत.आपण कोरोना मुळे स्वतःची काळजी करत आहेत.पण ऐन उन्हाळ्यात पक्षांची पण काळजी करायला पाहिजे.वाढत्या तापमानामुळे पशुपक्षी सैरभैर झाली असल्याने युवासेना अकलूज शहर प्रमुख यांनी चिमणी दिनाच्या निमित्ताने महषीॅ काॅलनी अकलूज येथे झाडांवरती पक्षांना पाणी पिण्या साठी मडकी बांधली.

 पशु पक्षी यांना उन्हाळ्यात गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे या उद्देशाने पाणपोई सुरू करताच चिमणी चिऊताई लगेच पाणी पिण्यासाठी तिथे आली जणू काय  युवा सैनिकांची पाणी ठेवण्याची वाटच बघत होती.तुम्ही पण घराच्या भवताली झाडांवर.भिंतींवर पक्षांसाठी पाणी ठेवा असे आवाहन अकलूज शहर युवासेना प्रमुख शेखर खिलारे यांनी केले आहे.
 
Top