नेवासा ,जि. अहमदनगर - १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव कर्पे या शेतकरी कुटूंबाने सामूहिक आत्महत्या केली होती व त्याची नोंद सर्वत्र झाली होती.
सदर कुटूंबाप्रति सद्भभावना व्यक्त करणेसाठी आज किसानपुत्र संघटना यांनी एक दिवसीय उपवास धरण्याचे अहवान केले होते.करोनोमुळे सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आहे त्या ठिकाणी कामकाज नियमित पाहून उपवास केला.
या उपवासात अविनाश कुटे पाटील यांची मुलगी व भाची याही सहभागी झाल्या होत्या. त्यांना शेतकरी कुटंब साहेबराव कर्पे यांची वास्तव घटना विशद करून शेतकरी कुटूंबाप्रति सर्वानी सद्भभावना व्यक्त करत साहेबराव कर्पे कुटूंब अमर रहे म्हणत सायंकाळी उपवास सोडला.