गोरेगाव:-दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कविश्रेष्ठ ( कुसुमाग्रज)विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्म दिवसानिमित्त आमच्या ए.के.आय.उर्दु शाळेमध्ये "मराठी राजभाषा दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कविता, नाट्य व कुसुमाग्रजांची माहिती असे कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.शाळेचे मुख्याध्यापक मुनिर अहमद अल्लाबक्ष यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.


या कार्यक्रमाला मराठी-हिंदी विभागाचे शिक्षक व शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गजगे सर, सौ. तारकेश्वरी बडगुजर मॅडम,व सौ.प्रतिभा मोरे मॅडम यांनी केले.मराठी-हिंदी विभागाचे प्रमुख सरफराज बेदरेकर सरांनी उपस्थितांचे स्वागत केले.सलीम मणेरी यांनी आभार मानले.
 
Top