बोल अनुभवी सूत्रांचे ,........

मळा माझा पाखारांच्या दिंड्यानी गजबजून गेला 
निसर्गाचा सांगावा मला उमजूनी आला 
मातीच्या गर्भातून चांदणे दाखवून गेला 
निसर्गाशी मैत्री हेच पसायदान गाउनी थवा 
आकाशी धांवला !!

त्यांच गाणं संगीत सुरात तालात अन एकाच पट्टीत 
गुण्यागोविंदाने नांदण्याचे सांगुनी गेला !!

निसर्ग वृक्षवल्ली फुलं नदी नाले डोंगर 
आपले दाते नात तोडू नका 
अनुभव बोलूनी गेला !!

सूर्य हाची कर्ताकरवीता सृष्टी माता पिता
निसर्गच देव हे विसरू नका संदेश देत गेला!!

आनंद कोठडीया,९४०४६९२२००


 
Top