आढीव - आढीव येथील भैरवनाथ बहुउद्देशीय अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उपसरपंच दिनकर आदिनाथ चव्हाण, मंडळाचे उपाध्यक्ष सचिव आणि विश्वस्त प्रत्येक रविवारी आढीव येथील भैरवनाथ दर्शन मंडप येथे अन्नदान करीत असतात .परंतु गेल्या चार-पाच आठवड्यांपासून कोरोनाच्या रोगांमुळे ते अन्नछत्र बंद ठेवलेले आहे. हे अन्नछत्र कोरोनाची साथ संपेपर्यंत चालू राहणार नाही. त्या छत्राचा दहा ते अकरा आठवड्यांचा निधी कोरोनाच्या साथीचा बंदोबस्त व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले ,तहसीलदार डॉ.वैशाली वाघमारे ,ग्रामीण पोलिस ठाण्यााचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके तसेच ग्रामपातळीवरील आरोग्याधिकारी पोलीस व इतर सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेला साथ देत। साथीचा बंदोबस्त व्हावा यासाठी ५१ हजार रुपयांचा डीडी दिलेला आहे.

 या मंडळाने यापूर्वी लातूर येथील किल्लारी भूकंप पासून व्यक्तिगत व सामुदायिक, केंद्र सरकार,राज्य सरकार आणि वेगळ्या खात्यात मदत म्हणून रक्कम देऊन सहकार्य केले आहे. 


भैरवनाथ बहुउद्देशिय अन्नछञ मंडळ आढीवच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.५१०००/- रुपयाचा हा धनादेश आढीवचे उपसरपंच दिनकर चव्हाण यांनी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ वैशाली वाघमारे, विठ्ठल मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पंढरपुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, तलाठी डोरले यांचेकडे सुपुर्द केला.
 
Top