योग असोशियन ,सोलापूर तर्फे सोलापूर येथील बुर्ला महाविद्यालयात जानेवारीमध्ये पंच परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये सोलापूरसह कोल्हापूर, पुणे ,मुंबई ,सांगली, उस्मानाबाद, नंदुरबार, रत्नागिरी या भागातील खेळाडू , योग शिक्षक, क्रीडाशिक्षक, डॉक्टर ,प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.
या परीक्षेमध्ये पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेतील चिंतामणी दामोदरे सर, मधुकर सुतार, विजयकुमार कांबळे हे उत्तीर्ण झाले आहेत.