पंढरपूर, प्रतिनिधी  - शाळा, कॉलेजच्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठ्या प्रमाणात वाव मिळत असतो. अशा स्नेहसंमेलनातूनच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असतो. यातूनच विद्यार्थी घडत असल्याचे पंढरपूर शहरचे पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरढोण येथील स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
 पुढे बोलताना गावडे म्हणाले की, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. युवकाने व्यसनाच्या आहारी न जाता युवकाने आपले भविष्य घडवावे. यदा कदाचीत यातून युवक बिघडला तर त्यांना सरळ करण्याचा आमचा दवाखान्यातून उपचार केला जाईल.माता भगिनिंची कोणी चेष्टा केली तर त्याने माझ्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहनही केले.
   जि.प.प्रा.शाळा शिरढोण येथील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगामध्ये असलेल्या विविध केलेचे दर्शन घडवले.प्रथमतः दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सई शिंदे यांनी केले.
   यावेळी आदर्श शिक्षिका अश्‍विनी तावस्कर व नुतन सरपंच मिनाक्षी गणेश भुसनर यांचा सत्कार करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जांबुवंत कांबळे, माळवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल भुसनर, मा. सरपंच दत्तात्रय कांबळे, मा. सरपंच बिभिषण बंडगर, विठ्ठलचे मा. संचालक दत्तात्रय चौगुले, उपसरपंच सविता लोखंडे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे ज्योतिराम बोंगे, नागनाथ क्षिरसागर, माऊली विजागत, प्रशांत वाघमारे, ढेरे साहेब, गणेश भुसनर, ग्रा.पं.सदस्य विजय भुसनर, आण्णासाहेब भुसनर, समाधान लोखंडे, जयवंत व्हरगर, करण भुसनर, समाधान शिरतोडे, नामदेव साळुंखे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळासाहेब लोखंडे व अश्‍विनी तावसकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सई शिंदे, राणी शंकर, आण्णा सावंत गुरूजी यांनी परिश्रम घेतले.
 
Top