भाग -४,
यामुळे राज्य शासनाला या आधारे राज्यांत वन जमीन हस्तांतर करताना खूप सूलभता प्राप्त झाली .
१६ . शासनाने उजनी जलाशयातून पाणी परवाने देणं फक्त धरणग्रस्त यांचाच विचार केला होता .
तथापी आम्ही प्रकल्पग्रस्ता प्रमाणेच अल्पभूधारक , अत्याल्प भूधारक , मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय यांनाही पाणी परवाने देणे मंजूर करून घेतलं .
पुढे शासनाने एक पाऊल पुढे टाकले .ठिबक सिंचन तत्वावर पाणी परवाने उपलब्ध केले .याकामी तत्कालीन मुख्य अभियंता श्री .सोडल साहेब यांनी खूप सकारात्मक दृष्टी ठेवली .मदत केली .मुद्दाम नमूद करत आहोत जेष्ठ मार्गदर्शक कृषीभूषण पद्मश्री आप्पासाहेब पवार यांनी खूप सहकार्य केलं .त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे .आज मीतीस १४५०० हेक्टर क्षेत्र करमाळा , माढा व इंदापूर तालुक्यात सिंचना खाली आलं आहे .
हे क्रांतिकारक काम आहे .
१७ .सहकारी तत्वावर मोठ्या प्रमाणावर उपसासिंचन व्यवस्था निर्माण झालया परंतु त्या फार दिवस टिकल्या नाहीत .बँकानीं वसुली जोरात केली .पण व्यक्तिगत योजनाना प्राधान्य दिलें .आणी यामुळेच मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आलं .या कमी आम्ही सर्वांना सक्रिय सहयोग दिला त्यामुळे एक नवं विश्व निर्माण झालं .यांतून वीज प्रश्न गंभीर पणे उभा राहिला .अगदी याचवेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते व नंतर मुख्यमंत्री झालेले ना .शरद पवार साहेब यांनी लक्ष घातले .करमाळा तालुक्यात वीज पुरवठा संदर्भात आराखडा तयार करून वीज पुरवठा सुरळीत केला .४०० के .व्ही , ११० के .व्ही .तर ३३ के .व्ही .यांचे जाळे निर्माण केलं .हे फक्त ना .शरद पवार साहेब यांनीच केलं .शेतकरी संग्राम परिषदेने वेळोवेळी केलेली आंदोलने खूप महत्त्वाची ठरलित .
यांत हजारो हात हातात घेऊन कार्यरत आहोत हे महत्त्वाचे आहे ......... 

उरर्वरीत भाग -५ क्रमशः  ....
 
Top