पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागेच्या काठावरील अनेक गावातून दिवसरात्र  यांत्रिकी बोटी, लॉरी, जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळु उपसा सुरु आहे; परंतु तलाठी,सर्कल जाणुनबुजुन वाळूचोरांना पाठीशी घालतात. १००% वाळुचोरी पैकी १०% वाळू चोरीवर कारवाई केली जाते. रोज पंढरपूर तालुक्यातून करोडो रुपयांची वाळु चोरी होते. तरी आपण याकडे स्वत: लक्ष घालनि अवैध वाळु उपसा करणार्‍यांवर व याकडे दुर्लक्ष करणार्‍या महसुल अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी.पंढरपूर तालुक्यातील वाळू उपसा करणारे वाळू तस्कर, संबंधित अधिकारी, तलाठी, सर्कल, कोतवाल यांचे मोबाईलचे लोकेशन, फोन रेकॉर्डींग व अधिकार्‍यांनी नेमलेले झिरो कर्मचारी यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्हाला तीव्र जन-आंदोलन करावे लागेल व याला संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा असा इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

रात्रंदिवस होणार्‍या वाळु उपशामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अवैध वाळु वाहतुकीमुळे अनेक गावाला जोडणारे रस्ते खराब झालेले आहेत. परिणामी शालेय विद्यार्थी, वयोवृध्द व ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अवैध वाळु उपसा करणारांना अधिकार्‍यांचे लोकेशन देणारे युवक जागोजागी दिसत आहेत . पंढरपूर तालुक्यातील वाळु कोल्हापूर, सांगली, पुणे, जत येथे मोठ्या प्रमाणाने ट्रक व टिपरद्वारे जाते. हे सर्व जनतेला कळते पण अधिकार्‍यांना का समजत नाही? आणि या वाळु चोरीवर तहसिलदार गप्प का? असा मजकुर सदर निवेदनात आहे.

यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना निवेदन देताना गणेश अंकुशराव, संपत सर्जे, वैभव कांबळे, शंकर शिंदे आदी उपस्थित होते .
 
Top