पंढरपूर ,(नागेश आदापूरे) - श्री संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थान तर्फे लाड सोनार समाजातील गरीब व गरजूना गहू १० किलो, तादुंळ ५ किलो, दाळ,तेल पिशवी अशा सामनाचे वाटप नरहरी मठामध्ये करण्यात आले.

 

 या वेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण मंजरतकर, उपाध्यक्ष संजय ढाळे, समाजध्यक्ष दत्तात्रय इंदापुरकर, उपाध्यक्ष जगदीश जोजारे तसेच समाज भुषण रवी सोनार ,उदय इंदापुरकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

  कोरोना महामारीपासून सर्व विश्वाचे रक्षण करण्यासाठी होमयज्ञ करण्यात आला. यासाठी संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब देवकर ,जोजारे महाराज  व भजनीमंङळ सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवत सात्विक कार्य पार पाडले. त्याबद्दल सर्वांचे समाजा तर्फे आभार मानण्याची आले.
 
Top