शेळवे ,(संभाजी वाघुले)- रुग्ण हक्क परिषदेबद्दल वृत्तपत्रात वाचले होते, लोकांकडून ऐकले होते. वैद्यकीय मदत आणि सर्वांनाच अशी मोफत मदत मिळाली पाहिजे यासाठी आपण सुरू केलेला लढा उल्लेखनीय आहे, त्यास जरूर यश मिळेल रुग्ण हक्क परिषद म्हणजे संकटात सापडलेल्या "माणसाला" मदत करणारी संघटना आहे, असे मत माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
     रुग्ण हक्क परिषदे केंद्रीय प्रधान कार्यालयाला माजी आमदार जयदेवराव गायकवाड यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याशी संवाद साधला,राजकीय सामाजिक चर्चा केली. रुग्ण हक्क परिषदेच्या ध्येय धोरण व कामाविषयी माहिती जाणून घेतली. 
     यावेळी उमेश चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. रुग्ण हक्क परिषदेचे कार्य आणि भूमिका हे स्वलिखीत पुस्तक भेट दिले. संघटनेचे महाराष्ट्र आणि राज्याबाहेर सुरू असलेल्या कामाचीही माहिती दिली.
        जयदेवराव गायकवाड हे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.फुले शाहू  आंबेडकरी विचारांचे लढवय्ये नेते आहेत. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
 
Top