पंढरपूर - जागतिक मुद्रण दिन छपाई तंञज्ञान शोधाचे जनक
जोहान्स गुटेनबर्ग यांचा जन्मदिवस या दिनानिमित्ताने पंढरपूर मुद्रक
संस्था पंढरपूरच्या वतीने कार्यक्रम करण्यात आला. मुद्रण दिन २४
फेब्रुवारी रोजी असतो. पण सर्वांच्या सोयीनी आज रविवारच्या दिवशी मुद्रण
दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीमती मानसी केसकर यांनी आपले मनोगत
व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आज स्टेजवर सर्व महिला
असल्यामुळे मी भारावून गेले आहे. आज महिला सर्व स्तरावर काम करीत आहेत.
त्यातही आज मुद्रक संस्थेचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी संपुर्ण कार्यक्रम
महिलाच्या हाती देऊन व त्यांच्या हातात सर्व सुत्रे दिली व हा कार्यक्रम
पार पाडला.
सौ.शैलजा जाधव आपल्या भाषणात म्हणाल्या ,गेल्या ४०
वर्षापासून आपण तनमन धनाने काम करून आपला संसाराचा वेलू उच्च स्तरावर नेला
आहे.माझी ओळख म्हणजे मुद्रणातील काकू म्हणून आहे.
यात मला खूप अभिमान आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.मैत्रेयी केसकर यांनी सर्व मुद्रकांचे
आभार मानले. मी एवढ्या लहान वयात, व माझ्यापेक्षा ज्येष्ठ भगिनी असतानाही
मला मुद्रक संघाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदाचा मान देऊन नवीन पिढीचा
सन्मान केला त्याबद्दल मुद्रक संघाचे अध्यक्ष दत्ता पाटील व त्यांच्या सर्व
कार्यकारिणीचे आभार मानते.माझे लग्न झाले त्यावेळेस मी या व्यवसायाशी
समरस झाले. मला प्रिटींग प्रेस मधील सर्व कामाचा अनुभव आहे. अगदी कागदाच्या
साईजपासून ते प्रिंटीग करून ग्राहकांना देईपर्यत सर्व गोष्टी मला माहीत
आहेत. कालांतराने व्यवसायात बदल होत गेला. मीही नोकरी मध्ये गेले. पण
माझ्या घरात रोज हाच विषय चर्चिला जातो. खरेतर स्पर्धेमुळे अनेक
व्यवसायिकामध्ये मतभेद होत असतात. पण आपण ते तेवढ्यापुरते घ्यावेत हा सल्ला
दिला. नवीन पिढी यामध्ये सक्रिय होत आहे. त्यांनी हा व्यवसाय चरितार्थ न
बनविता एक कला म्हणून पुढे न्यावा. व प्रत्येकांनी एकमेकाशी संलग्न राहून
स्पर्धा न करता हा व्यवसाय करावा व अशीच सर्व मुद्रकांची प्रगती व्हावी व
असेच उपक्रम रहावेत हीच माझी इच्छा आहे.
याप्रसंगी व्यापारी दिनदर्शिकेचे
प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
याचवेळी लहान मुले व महिलासाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम राबविण्यात
आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखा चंद्रराव यांनी केले , यावेळी यात भाग घेतलेल्या ११ जणांना बक्षिसे देऊन सन्मानित
केले.
पंढरपूर मुद्रक संस्थेच्या वतीने प्रिंटीग प्रेसच्या मालकांच्या
सहचारिणीसाठी एकुण सहा बक्षिसे व पंढरपूर शहरातील महिला कामगारांना लकी
ड्रॉ द्वारे पाच बक्षिसे देण्यात आली. या बक्षिसात कपाट सौ. प्रिती वैद्य,
ड्रेसिंग टेबल सौ. मिनाज नागठाण, कुलर सौ. वैशाली बिडकर, काचेच्या बेसची
शेगडी सौ. उज्वला बागडे, प्र्वासी बॅग सौ. वैशाली पाटील, कुकर सेट सौ.
राधा भट्टड, तर महिला कामगारासाठी कुलर, टेबल फॅन, मिक्सर, डिनर सेट, गॅस
शेगडी ही बक्षीसे देण्यात आली.
सदर कार्यक्रमात अध्यक्ष दत्ता पाटील, उपाध्यक्ष बबन सुरवसे, सचिव
रामकृष्ण बिडकर, सहसचिव मकरंद वैद्य,खजिनदार श्रीराम रसाळ, सहखजिनदार
संतोष गोंजारी, प्रदीप भोरकर, अमोल चव्हाण आदिंनी सहकार्य केले.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार केसकर यांनी तर आभार प्रदर्शन रामकृष्ण
बिडकर यांनी केले.