महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनाच्या अनुदानाची रक्कम नगर परिषदांना वेळेवर न दिल्याने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी वेतनासाठी नगरपरिषद कर्मचा-यांचे बोंबाबोंब आंदोलन - सुनिल वाळुजकर
पंढरपूर - महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांच्या वेतनाच्या अनुदानाची रक्कम नगरपरिषदांना वेळेवर न दिली गेल्याने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी वेतनासाठी नगरपरिषद कर्मचा-यांना शिमगा करण्याची वेळ आल्याने त्यासाठी राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड,राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.२० मार्च २०२० पासुन राज्यभर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.

 याबाबत राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांनी सांगितले की, यापुर्वी नगर परिषदेच्या फंडातुन कर्मचा-यांचे वेतन वेळेवर अदा केले जायचे परंतु शासनाने नगरपरिषदेचे उत्पन्न असलेले जकात कर बंद करुन नगरपरिषद कर्मचा-यांच्या होणा-या वेतनाची रक्कम शासना कडून अदा केली जात होती. परंतु गेल्या २-३ वर्षांपासुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम शासनाकडून नगरपरिषदांना वेळेवर न मिळाल्याने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचा-यांना दोन ते तीन महिने वेतनापासुन वंचित रहावे लागते व नगर परिषदांचे सुद्धा उत्पन्न कमी असल्याने कर्मचा-यांचे वेतन करण्यास नगरपरिषद असमर्थ ठरते. नगरपरिषद कर्मचा-यांना प्रत्येक महिन्याच्या २० ते २५ तारखेपर्यंत वेतनाची वाट पहावी लागते. म्हणुन गुढीपाडव्यासारखा सण जवळ आलेला असतानासुद्धा शासनाकडुन सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम न मिळाल्याने वेतनासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्याची वेळ कर्मचा-यावर आली आहे.
त्यामुळे येत्या १९ तारखेपर्यंत सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम शासनाकडुन न मिळाल्यास दि.२० मार्च २०२० पासुन वेतन होईपर्यंत दररोज सकाळी ११ वाजता  महाराष्ट्रातील प्रत्येक नगरपरिषदे समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीने घेतला आहे. सहाय्यक वेतन अनुदानाची फरकाची रक्कम त्वरीत नगर परिषदांना मिळावी. शासनाने नगरपरिषद कर्मचा-यांना ७ वा वेतन लागु केला असुन मागील कालावधीतील थकबाकी रक्कम सन २०१९-२० पासुन पुढील ५ वर्षांत पंचवार्षीक हप्त्यात देण्यास मान्यता दिलेली थकबाकी फरकाची रक्कम शासना कडुन सहाय्यक अनुदानाच्या फरका पोटी अदा करावी व यापुढे नगरपरिषद कर्मचा-यांचे सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला नगरपरिषदेच्या खात्यावर जमा न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या ५ तारखे पासून बोंबोबोंब आंदोलन करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतल्याचे राज्याचे जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर  यांनी सागंतिले.
 
Top