मंगळवेढा - रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात युटोपियन शुगर्स लि पंतनगर, कचरेवाडी ता. मंगळवेढा येथे संपन्न झाली.कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांचे शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. या वेळेस “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
 
Top