गोरेगाव,(अलिबाग)- ७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत गोरेगाव यांच्या मार्फत सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या सांस्कृतिक व क्रीडामहोत्सवात गोरेगाव मधील सर्व बालवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये बालवाडी इ.१ली ते ४थी मुले/मुली, इ.५वी ते७वी मुले/मुली, व इ.८वी१०वी मुले/मुली असे गट करण्यात आले होते. या सर्व गटात ए.के.आय.उर्दू हायस्कूलच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. 
 इयत्ता ५वी ते ७वी मुलांच्या गटात १००मी.धावणे तलहा बिलाल जोगिलकर-तृतीय क्रमांक, गोळाफेक शोएब सलीम वस्ता-प्रथम क्रमांक, संगीत खुर्ची तृतीय क्रमांक तर एक मिनिट शो मध्ये प्रथम क्रमांक हंजला निसार अहमद सैनने पटकाविला.
 मुलांच्या सांघिक खेळात रस्सीखेच- प्रथम क्रमांक खो-खो खेळात - द्वितीय क्रमांक व कबड्डीत द्वितीय क्रमांक याचप्रमाणे इ.५वी ते७वी मुलींच्या गटात १००मी.धावण्यात प्रथम क्रमांक, संगीत खुर्चीत प्रथम क्रमांक,गोळाफेक तृतीय क्रमांक तसेच एक मिनिट शो मध्ये तृतीय क्रमांक कु.आलिया उस्मान डावरे हिने पटकाविला. गोळाफेक प्रथम क्रमांक कु.उमेमा मैनुद्दीन डावरे, सामिया इम्रान येलुकर- द्वितीय क्रमांक,एक मिनिट शो मध्ये द्वितीय क्रमांक कु.जुहा फैरोज सरखोत तसेच सांघिक खेळात रस्सीखेच प्रथम क्रमांक खो-खो या क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला.
 

याचबरोबर इ.८वी ते १० वी मुलांच्या गटात १०० मी.धावणे प्रकारात द्वितीय क्रमांक मासुमरजा असिक अली सलमानी तर तृतीय क्रमांक आम्माद अमानुल्ला मुकादम आणि गोळाफेक -शैजान हुसेनखान पठाण प्रथम क्रमांक,अल्तमश सलीमुद्दीन अन्सारी- तृतीय क्रमांक, एक मिनिट शोमध्ये आकिब जिब्राईल खान-प्रथम क्रमांक अय्यान दिलावरओमर -तृतीय क्रमांक मटका फोडी मुलामध्ये मुनिम मुराद बहुर -द्वितीय क्रमांक, तर शैजान हुसेनखान पठाण-तृतीय क्रमांक ,संगीत खुर्ची मुलांमध्ये मासुमरजा असिक अली सलमानी-द्वितीय क्रमांक, सांघिक खेळात रस्सीखेच प्रथम क्रमांक खो-खो मध्ये द्वितीय क्रमांक तर कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. 
 इ.८वी ते१०वी मुलींच्या गटात १००मी. धावणे प्रथम क्रमांक- कु.बतुल असिफ गजगे ,गोळाफेक प्रथम क्रमांक-आरिशा आरीफ हुर्जुक, द्वितीय क्रमांक-अल्फा मुसा जोगिलकर तृतीय क्रमांक रुख्सार शहबाज खान, मटका फोड प्रकारात प्रथम क्रमांक - कशफ मो.शफी शेख, तृतीय क्रमांक-फातिमा सज्जाद जुम्मल ,
संगीत खुर्चीत अरिबा मो.हनिफ बहुर-तृतीय क्रमांक,एक मिनिट शो मध्ये द्वितीय क्रमांक फातिमा  सज्जाद जुम्मल तर कु.कशफ मो.शफी शेख-तृतीय क्रमांक पटकाविला.अशा विविध क्रीडाप्रकारात आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. 
या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक सर्फराज अफसर बेदरेकर ,मोहसिन मुर्तूजा शेख,कैसर हर्गे , रोजिना उबारे व क्रीडासमितीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे मागर्गदर्शन लाभले.                                                                                            क्रीडास्पर्धेनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन गोरेगाव ग्रामपंचायतमार्फत करण्यात आले होते. यामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी "सायलेंट स्कीट" शो व "सफाई अभियान" हे नाटक सादर केले. या सर्व प्रकारात आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.  सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिस अंजुम अब्बासी, ,सलीम मणेरी,समीर गजगे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.                        या सर्व यशस्वी खेळांडूना व सांस्कृतिक कार्यक्रमातील यशस्वी कलाकारांना २६जानेवारी प्रजासत्ताकदिनी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेरभाई अंजुम अब्बासी,उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व मान्यवर व्यक्तींच्या हस्ते पदक, सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सम्मान करण्यात आला.  त्याचप्रमाणे क्रीडा व सांस्कृतिक  कार्यक्रमात उत्कृष्ट कार्याबद्दल सर्फराज अफसर बेदरेकर, मोहसिन मुर्तूजा शेख व अनिस अंजुम अब्बासी यांचा शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.   
या सर्व यशस्वी खेळांडूचे व कलाकार विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व सेक्रेटरी शाळेचे मुख्याध्यापक मुनीर अहमद अल्लाबक्ष, जमातुल मुस्लिमीन गोरेगाव, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक-पालक संघाचे सर्व सदस्य, सर्व  शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.
 
Top