नातेपुते,(श्रीकांत बाविस्कर)-दिनांक२८-०२-२०२ रोजी जिजामाता कन्या प्रशाला,अकलूज येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून होम सायन्सचे शिक्षक  घाडगे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रशालेच्या मुख्याध्यापकी जैन मॅडम होत्या. मार्गदशक शिक्षक कांबळे सर, राजमाने मॅडम, शेलार सर, बिभीषण जाधव सर,पालक वर्ग, रश्मी पुंज उपस्थित होते. या वेळी ११ वीच्या मुलींनी प्रयोग सादर केले. प्रमुख पाहुणे घाडगे सर यांनी मुलींना मार्गदर्शन करताना,सत्याचा शोध म्हणजे विज्ञान हा विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला पाहिजे असं सांगितलं. सायन्स म्हणजे अवघड विषय वाटतो पण सायन्स म्हणजे सिम्पली सिटी.विघमान व निघामन असे दोन प्रकार आहेत त्यात उदाहरण देताना त्यांनी सफरचंद खाली का पडले हा विचार न करता ते वर का गेले नाही असा विचार केला म्हणून त्यांना असा शोध लागला की काहीतरी खाली ओढतय म्हणून गुरुत्वाकर्षणचा शोध लागला.सत्य कायम बदलत असते त्या बदलण्याचा प्रकियेला विज्ञान अस म्हणतात. त्यात त्यांनी मातीशिवाय शेती कशी करावी याचे काही प्रयोग मुलांना दाखवले ,त्याला हायड्रोपोनिक शेती अस म्हणतात.इतिहास,भूगोल ,गणित यातसुध्दा विज्ञान आहे".अस त्यांनी सांगितलं.
 निकिता पुंज,संस्कृती क्षीरसागर आदींची भाषणे झाली .
 
Top