पंढरपूर - दिनांक २५/०२/२०२० रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ, पंढरपूर यांच्यावतीने शिवजयंती निमित्त तायकांदो कराटे फाईट स्पर्धा संत तनपुरे महाराज मठ या ठिकाणी संपन्न झाली.
 स्पर्धेचे उद्घाटन विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, युनियन बँकेचे मॅनेजर बळीराम इबीतवार,तात्या देवकर,जयदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 


सर्व शाळेमधील जवळपास ३०० ते ३५० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.सदर स्पर्धेचे आयोजन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ, तालुका अध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार , शहर उपाध्यक्ष शामराव साळूंखे ,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नागेश गायकवाड,विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रणव गायकवाड,शाखाध्यक्ष सचिन थिटे यांनी प्रयत्न केले. 


सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी पंढरपूर तायकांदो असोसिएशनचे अध्यक्ष मयूर वागज, सचिव महेश गावडे,खजिनदार आबासाहेब वाघमोडे तसेच पंच म्हणून अजय गुसाळे ,युवराज लोहार ,ओंकार नलवडे, कल्याण सावंत ,शुभम पवार, वरुण पाटील यांनी परिश्रम घेतले.
 

सर्व यशस्वी स्पर्धकांना गोल्ड सिल्वर ब्राउझ मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. मराठा महासंघाने आगळीवेगळी स्पर्धा घेऊन मुला-मुलींना संधी दिली. सर्व शाळांनी सहभाग घेतला या मध्ये प्रथम क्रमांक अरिहंत पब्लिक स्कूल, दुतीय क्रमांक लोटस इंग्लिश स्कूल,त्रुतीय क्रमांक कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम बिस्किटे सर यांनी केले. आभार शहराध्यक्ष अमोल पवार यांनी मानले.
 
Top