मुंबई दि.१५ - भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे. मात्र या महत्वपूर्ण निर्णयावरून राज्य सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची मतभिन्नता जाहीर उघड झाली आहे. राज्य सरकारमधील निर्णय अंतर्गत चर्चेतून एकमत करून घेतले गेले पाहिजेत.भीमा कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर येणे योग्य नसल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

 भीमा कोरेगाव प्रकरणातील एल्गार परिषदेचा तपास एनआयए करणार आहे त्याबरोबर भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या  हल्ल्याचाही तपास एनआयएला देण्यात यावा अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
  एखाद्या प्रकरणावरून राज्य सरकारमधील सत्ता पक्षांतील नेत्यांचे जाहीर वाद होणे योग्य नाही. असे या पूर्वीही कधीही झाले नाही.सरकारने अंतर्गत चर्चा करून निर्णय घेतले पाहिजेत. जाहीररित्या वाद टाळले पाहिजेत असा सल्ला  ना.रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.    
 
Top