गेल्या काही दिवसात राज्यात हादरवणाऱ्या घटना घडत आहेत. हिगणघाट परिसरात एक शिक्षिकेला भर रस्त्यात पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याची घटना घडली होती.तर दोनच दिवसात या घटनेची पुनरावृत्ती औरंगाबादमध्ये तसेच मुंबईत घडली.एका महिलेला तिच्या घरात घुसून नराधमाने अंगावर रॉकेल ओतून तिला जाळण्याची धक्कदायक घटना घडली. लग्नाला नकार दिल्याने पोलीस खात्यातील अधिकाऱ्याने महिला अधिकार्‍याचा खून करून स्वतः हत्या केली.
मन सुन्न करणाऱ्या या घटनेचा सर्व स्थरातून निषध होत आहे. याच धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमी वर अनेक राजकीय नेत्यांनी आपला निषेध सोशल मीडियाच्या माध्यमांतून नोंदवला आहे.भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी देखील वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबदमधील घटनेवरुन संताप व्यक्त केला असून महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार होत असल्याचं म्हटलं आहे.

उदयनराजे यांनी दोन्ही घटनांवरुन संताप व्यक्त करत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे”.
राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची गांभीर्याने दखल घ्या, गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करा,असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहविभागास दिले आहेत.महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. यात हयगय करणार्‍यांना माफी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिस यंत्रणेतील कोणतीही व्यक्ती, मग ती अधिकारी असेल किंवा कर्मचारी, जे या कामात टाळाटाळ करतील किंवा विलंब लावतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. महिलांना मोकळेपणाने आपल्यावरील अत्याचाराची माहिती पोलीस ठाण्यात येऊन नोंदवता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस ठाणी सुरू करण्यासंबंधी गृहविभागाने चाचपणी करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. असे असले तरी शिक्षा होण्याचे प्रमाण जवळपास शून्य आहे त्यामुळे अपराध यांचे फावत आहे .गुन्हेगारांत पोलिसांविषयी धाक निर्माण व्हावा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. राज्याचा कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गैरवर्तनाची नेमकी मानसिकता कशामुळे होत आहे याबाबत सविस्तर आढावा घ्यावा. अनुचित प्रकार थांविण्यासाठी एक कार्यक्रम अथवा कृती आराखडा बनवून एक जरब निर्माण करावी, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टी समाजात होणार नाहीत, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. हे सर्व जरी ग्राह्य धरले तरीही ही महिलांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा त्यांना मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार केव्हा प्राप्त होणार हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. इतके दिवस महिलांना एकटे गाठून अशा प्रकारच्या घटना घडत होत्या मात्र आता महिला घरातच सुरक्षित नाहीत यावर प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली आहे. लोकभावना पाहता नागरिक कायदा हातात घेण्याच्या तयारीत आहेत आणि त्याशिवाय अपराध्यांना वचक बसणार नाही हेही तेवढेच खरे आहे. आज बालिकेपासून वृद्ध महिलां पर्यंत कोणीही सुरक्षित नाही हे गोष्ट नाकारून चालत नाही गुन्हा करणार आहे कोणीही असू शकते त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्यासाठी आंध्र पोलिसांनी वापरलेली प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
 
Top