पंढरपूर - तरुणाचे अपहरण करुन खंडणी मागितलेल्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीं वर मोक्का अंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती, काही दिवसांपूर्वी शहरातील तरुणाची मोटारसायकल घेवून त्यांचे अपहरण केले होते. तसेच त्याला खंडणी मागितल्याचा गुन्हा भादंवि 364,384,385,387, 143,147, 149, 323,504,506 प्रमाणे शंकर सुरवसे, वैभव फसलकर , ज्ञानेश्वर कडलासकर, रोहित अभंगराव, सचिन आवताडे आणि इतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात वरील आरोपी आपली टोळी बनवून संघटीत गुन्हेगारी करीत आर्थिक लाभ मिळवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(i),3 (1)(ii), 3(2),3(4) प्रमाणे कारवाईचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

सदरच्या मोक्का अंर्तगत कारवाईला पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक डॉ. सागर कवडेंनी दिली. या गुन्हेगारांचा आता मोक्का कलमानुसार तपास होणार आहे.


पंढरपूरातील संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्या साठी सोलापूर ग्रामीण पोलिस दल शर्थीचे प्रयत्न करीत आहे.अशा टोळ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले आहे.
  सदरची कारवाई ही पंढरपूर विभागात पाचवी कारवाई आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात २ गुन्ह्यात ३२ आरोपींवर, तालुका पोलिस ठाण्यात एका गुन्ह्यात ६ आरोपींवर तर करकंब पोलिसांनी २ गुंह्यात १० आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.आजपर्यंत विभागात ४८ आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याने गुन्हेगारी टोळ्याचे धाबे दणाणले आहेत.
वरील कामगिरी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे,पंढरपूर शहर पो.नि. दयानंद गावडे, तालुका पो.नि.किरण अवचर, सपोनि प्रशांत पाटील, सहाय्यक फौजदार हमीद शेख यांच्या पथकाने केली आहे.

पंढरपूरातील संघटीत गुन्हेगारीचा बिमोड करण्या साठी सोलापूर ग्रामीण पोलिस दल शर्थीचे प्रयत्न करीत आहे.अशा टोळ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.
 
Top